सातारा : सातारा तालुक्यातील पाली रोहोट येथे नवशिरी भैरी देवी मंदिरामध्ये चोरीची घटना घडली आहे.याप्रकरणी विश्वनाथ तुकाराम लोखंडे (वय ६०,रा. र कृष्णानगर,सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
रोहोट गावातील नौशिरी भैरी देवी मंदिराचे कुलूप कापून मंदिरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी विश्वनाथ तुकाराम लोखंडे (वय ६० रा. कृष्णनगर,सातारा) यांनी फिर्याद दिली असून अक्षय अर्जुन पवार (वय ३० रा. चिंचणी ता. कराड) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६२ ३०३(२) प्रमाणे चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोहिते करत असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.