धरणग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

विविध मागण्यांसाठी वेधले शासनाचे लक्ष

सातारा : तारळी धरणग्रस्तांचे गेले २७ वर्षापासून शासन दरबारी प्रश्न प्रलंबित आहेत. संकलन रजिस्टरचे अद्ययावतीकरण तसेच तारळे येथे नवीन जागेवर प्रकल्पाच्या व्याप्तीत बदल करून नवीन गावठाणाच्या सुविधा देण्यात याव्यात.  यासह विविध मागण्यांसाठी राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रमिक मुक्ती दल समतावादी संघटनेचे राज्य संघटक डॉ. प्रशांत पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.

तारळी धरणग्रस्त यांचे गेल्या 27 वर्षापासून बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत. शासन दरबारी त्यांना अजून न्याय मिळालेला नाही. डांगिष्टेवाडी गावाजवळ तारळी प्रकल्पाचा नवीन जागेवर पुनर्वास करून प्रकल्पग्रस्तांना जागा मिळावी वाढीव लाभक्षेत्राचे अधिसूचना निघाली बंदी लागू झाला. मात्र, त्याप्रमाणे संकलन रजिस्टर अद्ययावत झाले नाही, पर्यायी जमिनीच्या कब्जा हक्काच्या रकमेची अधिसूचना प्रसिद्ध करण्याबाबत शासन निर्णय कायद्याच्या विरुद्ध आणि प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारा  आहे, त्यामुळे तो रद्द करावा. जिरायत व बागायत मधील फरक असलेली पीक नुकसान भरपाई गेल्या 16 वर्षापासून प्रकल्पग्रस्तांना मिळावी. गावठाण यांचे कजाप तातडीने करणे, प्रकल्पग्रस्तांना संपादित जमिनीचे स्वतंत्र सातबारे नकाशे देणे, गावठाण परिपूर्तीसाठी गावठाण शेजारी जागा संपादित करणे, भांबे येथील सानुग्रह अनुदान संपादन रखडलेले आहेत त्याची नुकसान भरपाई आणि त्वरित वाटप प्रकल्पग्रस्तांना वाटप करणे, जमीन कसणेयोग्य करून मिळणे, तारळी धरणामध्ये पर्यटनास प्रोत्साहन मिळण्यासाठी बोटिंगला परवानगी मिळणे. नवीन तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्तांना 1 लाख 65 हजार रुपये घर बांधणीसाठी अनुदान वाटप करणे या मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.

मागील बातमी
अंगणवाडी सेविकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पुढील बातमी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा बुधवारी प्रथम दीक्षांत समारंभ

संबंधित बातम्या