पुण्यात चोरलेली दुचाकी सापडली सातार्‍यात; सातारा शहर वाहतूक शाखेची कौतुकास्पद कामगिरी; पुणे पोलिसांकडे दुचाकी वर्ग

by Team Satara Today | published on : 02 November 2026


सातारा : पुणे येथे चोरी झालेली दुचाकी सातारा वाहतूक विभागातील पोलिसामुळे शहरात सापडली. बेवारस सापडलेल्या दुचाकीचा तपास केल्यानंतर ती पुणे पोलिसांकडे देण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सातारा शहर वाहतूकचे पोलीस निलेेश दयाल हे कर्तव्य बजावत असताना त्यांना बेवारस स्थितीमध्ये नंबर प्लेट नसलेली एक दुचाकी दिसली. परिसरात माहिती घेतल्यानंतर ती कोणाची नसल्याने दुचाकी वाहतूक विभागात आणली. दुचाकीची सर्व तांत्रिक माहिती घेतली असता संबंधित दुचाकी चोरी झाल्याबाबत पुणे येथील सिंहगड पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे निदर्शनास आले.
सपोनि राजेेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निलेश दयाल यांनी तपास करुन पुणे पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पुणे पोलिसांकडे ती दुचाकी वर्ग केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
केसरकर पेठेत घरफोडी; 32 हजार 700 रुपये किंमतीचे दागिने लंपास
पुढील बातमी
दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या