सातारा : अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी सातारा पोलिसांनी दोनजणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरासह तालुका हद्दीत पोलिसांनी बेकायदा दारु अड्ड्यावर छापे टाकले. बेकायदा दारु विक्री प्रकरणी महिलेवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अजंठा चौक येथे पोलिसांनी 13 नोव्हेबर रोजी ही कारवाई केली. पोलिसांनी महिलेकडून 1750 रुपये किंमतीच्या 50 दारुच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.
दुसरा गुन्हा अशोक जयसिंग आवळे (वय 54, रा. मालगाव ता.सातारा) याच्या विरुध्द दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 25 हजार 660 रुपये किंमतीच्या 394 बाटल्या जप्त केल्या आहेत. पोलिसांनी मालगाव येथे ही कारवाई केली आहे.