सातारा : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माण, खटाव आणि फलटण या तीन तालुक्यांमधील तब्बल ४९ गावे आणि २६५ वाड्या सध्या पाणीटंचाईचा सामना करत आहेत. या बाधित भागातील ६२ हजार ८९२ लोकसंख्या आणि ४४ हजार ३४१ पशुधनाची तहान भागवण्यासाठी प्रशासनाकडून सध्या ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
माण तालुक्यातील ३८ गावे आणि २२४ वाड्यांमधील ५१ हजार ७९६ नागरिक व ४१ हजार १४१ पशुधन टंचाईने प्रभावित झाले आहेत. येथे टंचाईवर मात करण्यासाठी १ शासकीय आणि ३२ खाजगी अशा एकूण ३३ टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा सुरू आहे. खटाव तालुक्यातील ९ गावे आणि ३९ वाड्यांमधील ९ हजार ७२४ नागरिक व ३ हजार १५५ पशुधनाला ५ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
फलटण तालुक्यात २ गावे आणि २ वाड्यांमधील १ हजार ३७२ लोकसंख्या व ४५ पशुधनाला १ खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच एकूण १० विहिरी व १० बोअरवेल अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत ३९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू
by Team Satara Today | published on : 21 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा