सातारा तालुक्यात प्लॅस्टिक विरोधी कारवाईला जोर; वर्ये, सैदापूर, कोंडवे, हमदाबाज, कोडोली, संभाजीनगरमध्ये चाळीस हजारांहून अधिक दंडाची वसुली

by Team Satara Today | published on : 15 October 2025


सातारा  :  मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या निर्देशानुसार प्लॅस्टिक कचऱ्यावरील नियंत्रण आणि स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्लॅस्टिक विरोधी मोहीम जोरात सुरू आहे.  या मोहिमेचा एक भाग म्हणून सातारा तालुक्यातील कोडोली आणि संभाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या कारवाईदरम्यान प्लॅस्टिकच्या पिशव्या, थर्माकोल प्लेट्स, कप, ग्लास, तसेच एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिक वस्तू विक्रीसाठी ठेवणाऱ्या दुकानदारांकडून प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. या मोहिमेत एकूण 41200 रुपयांहून अधिक दंडाची वसुली करण्यात आली असून, प्लॅस्टिक वापरणाऱ्या तसेच साठवणूक करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

प्रशासनाचे सक्रिय पथक मैदानात

या कारवाई मोहिमेमध्ये जिल्हा परिषदेचे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेचे, प्रकल्प संचालक,  मा.विश्वास सिद सर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सहाय्यक गटविकास अधिकारी संतोष पवार, जिल्हा तज्ञ राजेश भोसले, नीलिमा सनमुख,अजय राऊत,  विस्तार अधिकारी रवींद्र दळवी, बीआरसी अमित गायकवाड, हेमा बडदे, प्रियंका देशमुख, तसेच संभाजीनगरचे सरपंच सतीश माने,  इतर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी  प्रवीण पवार,सचिन सरगडे, नामदेव लोहार, अनुजा भगत, रूपाली धाराशिवकर, अमोल खाडे,हिंदुराव डेरे,बजरंग मोरे सर्व कर्मचारी यांनी एकत्रितपणे सहभाग घेतला.

या पथकाने गावागावात फिरून प्लॅस्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांना समज देत जनजागृती केली तसेच नियमभंग करणाऱ्यांवर तत्काळ दंडात्मक कारवाई केली.


 मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश

मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांनी सर्व तालुक्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, “प्लॅस्टिक बंदी ही केवळ आदेशापुरती न राहता तिची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. प्रत्येक ग्रामपंचायतीने स्वतः जबाबदारीने सहभाग घ्यावा आणि नागरिकांना प्लॅस्टिक वापर टाळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.”


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सीताफळ खाण्याचे अनेक गुणकारी फायदे
पुढील बातमी
जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील आरक्षणावरील हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी 17 ऑक्टोबरपर्यंत

संबंधित बातम्या