सातारा : श्रीरामकृष्ण विवेकानंद भाव प्रचार परिषद महाराष्ट्र यांच्यातंर्गत कार्यरत असलेल्या श्रीरामकृष्ण सेवा मंडळ यांच्यावतीने नेहमीच विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले जातात. यापूर्वी जिल्हयात, राज्यात, देशात आलेल्या विविध नैसर्गिक आपत्तीदरम्यान श्रीरामकृष्ण मंडळाने नेहमीच मदतीचा हात दिला आहे. नुकतेच चिमणगाव (ता. कोरेगाव, जि.सातारा) येथील जळीतग्रस्त कुटुंबांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. चिमणगाव (ता. कोरेगाव)येथे लागलेल्या आगीत काही कुटुंबांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. अशा काही जळीतग्रस्त कुटुंबांना श्रीरामकृष्ण सेवा मंडळ सातारा तर्फे संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, साखर, पोहे, रवा, तूरडाळ, चवळी, शेंगदाणे, चहा, तयार तिखट, जिरे, मोहरी, हळद, तेल, अंगाचे साबण, कपड्याचे साबण / पावडर, काडेपेटी बॉक्स, टॉवेल, सतरंजी, रग, कपडे, भांडी या वस्तूंचा समावेश होता. जळीतग्रस्त कुटुंबांना मदत करावी अशा केलेल्या आवाहनातून जमा झालेल्या निधीतून आणि उपलब्ध निधीमधून हे वाटप करण्यात आले. सेवा मंडळाचे सदस्य नरेश जाधव, राजेंद्र जाधव, अनिरुध्द कोकाटे, धीरज माने, नील दळवी, अनिकेत गोरे यांनी हे वाटप केले. यावेळी चिमणगांव येथील रहिवासी देखील उपस्थित होते.
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे संसारोपयोगी वस्तूंचे वाटप
by Team Satara Today | published on : 14 April 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात आज साहित्य संमेलनाच्या संमेलन गीत लोकार्पण सोहळा
December 21, 2025
बॉम्बे रेस्टॉरंट चौकात झोपडपट्टीच्या आडोशाला जुगार अड्ड्यावर धाड
December 21, 2025
बनावट मृत्युपत्र केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा
December 21, 2025
मालगाव येथील डीपीमधील तांब्याच्या 24 हजार रुपये किमतीच्या तारेची चोरी
December 20, 2025
डॉ. शालिनीताई पाटील : लढवय्या, करारी नेत्या
December 20, 2025