आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक क्षणार्धात होईल स्वच्छ!

दह्यामध्ये मिक्स करा 'हा' आयुर्वेदिक पदार्थ

by Team Satara Today | published on : 08 April 2025


शरीराचे कार्य संपूर्ण पचनसंस्थेवर अवलंबून असते. पण काहीवेळा जंक फूडचे सेवन, तिखट तेलकट पदार्थाचे अतिसेवन इत्यादीमुळे शरीराच्या पचनसंस्थेमध्ये बदल होण्याची शक्यता असते. पचनसंस्था बिघडल्यानंतर शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. याचा परिणाम पोटाच्या आरोग्यावर लगेच दिसून येतो. गॅस, अपचन, ऍसिडिटी आणि पचनाच्या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. मात्र सतत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करतात. पण सतत गोळ्या खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे.

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स,पुरळ येणे, पोटात दुखणे, वारंवार आजारी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी दह्याचे सेवन करावे. दही खाल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर सुधारते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी दह्यासोबत कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

दही गूळ:

दही आणि गूळ एकत्र खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. आतड्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी अर्धा वाटी दह्यात थोडस गूळ टाकून मिक्स करून खा. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात. यासाठी अर्धावाटी दही घेऊन त्यात गूळ मिक्स करून रात्रभर तसेच ठेवून घ्या.त्यानंतर सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी दह्याच्या मिश्रणाचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेले हानिकारक घटक बाहेर पडून जातात.

दही गूळ खाल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

बद्धकोष्ठतेच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. बद्धकोष्ठतेचा समस्या वाढू लागल्यानंतर पोटात दुखणे, ऍसिडिटी, गॅस इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते. गूळ आतड्यांमध्ये हलक्या मुव्हमेंटस निर्माण करते, ज्यामुळे पोट स्वच्छ होते. पोटाच्या आतील भागात आलेली सूज कमी करण्यासाठी नियमित दही आणि गूळ खावेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गूळ खाल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते.

पचनक्रिया सुधारते:

शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी दही खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे दह्यात गूळ मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. दही आणि गूळ एकत्र करून खाल्यामुळे पचनसंस्थेला अनेक फायदे होतात. गुळामध्ये नैसर्गिक एंजाईम्स आढळून येतात, ज्यामुळे जेवलेले अन्नपदार्थ सहज पचन होतात. याशिवाय दह्यातील लॅक्टिक ऍसिड पचनक्रिया जलद करून आतड्यांचे कार्य सुधारण्यासाठी मदत करतात. मात्र काहीवेळा पोट फुगणे, भूक मंदावणे किंवा अन्नपचनात अडचणी इत्यादी समस्या उद्भवू लागल्यास दही आणि गूळ खावे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लाडक्या बहिणींकडून ओवाळणी वसूल
पुढील बातमी
घरगुती गॅस दरवाढी विरोधात सुषमा राजेघोरपडे यांचे चुलीवर भाकरी थापो आंदोलन

संबंधित बातम्या