शटरचे कुलूप काढण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाला हिंसक वळण; खणआळीत दोन गटांत मारामारी

by Team Satara Today | published on : 07 September 2026


सातारा : शटरचे कुलूप काढण्याच्या मुद्द्यावरून झालेल्या वादाला हिंसक वळण मिळून शुक्रवार पेठेतील खणआळी परिसरात दोन गट आमनेसामने आले. या झटापटीत लोखंडी रॉड आणि हातोड्याचा वापर झाल्याचे दोन्ही बाजूंच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एका व्यक्तीला ग्राइंडरमुळे दुखापत झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.  याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
तुषार हरी कासट यांच्या तक्रारीनुसार, दुकानासमोरील दरवाजाचे कुलूप काढण्यास सांगितल्यावर वादाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांच्यासह भांडण सोडविण्यासाठी आलेल्या भावाला व अन्य व्यक्तींना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. लोखंडी रॉडने डोक्यात आणि पाठीवर मारल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
दुसऱ्या बाजूने नरेश गोविंद अच्युताणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बंद दुकानाचे कुलूप हातोडी व कटरच्या साहाय्याने तोडले जात असल्याबाबत विचारणा केली असता त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या भावाला लोखंडी रॉडने मारहाण झाल्याचे, तर एका अनोळखी व्यक्तीने ग्राइंडरच्या साहाय्याने दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल झाले असून, पुढील तपास पोलिस हवालदार भोसले व मोहिते करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेचा हात पकडून गैरवर्तन केल्याचा आरोप; संशयितावर गुन्हा
पुढील बातमी
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी संतोष पाटील, अर्ज करण्यासाठी ११ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

संबंधित बातम्या