सातारा : जिल्ह्यासह फलटणच्या राजकारणातून प्रभाव संपत चाललेल्या सातारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा विधान परिषदेचे माजी सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आडून अस्तित्व टिकवण्यासाठी मध्यरात्रीच्या भेटीगाठींचे राजकीय प्रयोग सुरू केले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज आणि पॅनेल निश्चिती अंतिम टप्प्यात असताना, मिस्टर रामराजे यांनी शिवसेना नेते शेखर गोरे यांची हॉटेल प्रीतीमध्ये घेतलेली सव्वा तासाची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. फलटण तालुक्यात तब्बल तीन दशके राहिलेल्या एकछत्री अंमलाची अखेर राजकीय भैरवी वाजल्यानंतर, जिल्ह्याच्या पटलावरूनही मिस्टर रामराजे यांचे वर्चस्व जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र आहे. असे असताना ‘दोन हाणा, पण जिल्ह्याचा पुढारी म्हणा’ या थाटात मिस्टर रामराजे जिल्हा बँकेच्या निमित्ताने नाहक ‘मसल फ्लेक्सिंग’ करत असून, राजकीय ताकद शिल्लक नसताना चाललेला हा आटापिटा मात्र राजकीय जाणकारांच्या नजरेत निव्वळ हास्यास्पद ठरत आहे.
दुसरीकडे महायुतीत जागावाटपाची रस्सीखेच सुरू असताना आणि जयकुमार गोरे यांच्याशी असलेल्या घरच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, मिस्टर रामराजे यांनी शेखर गोरेंशी केलेली ही चर्चा म्हणजे स्वतःची बुडती पत वाचवण्यासाठी केलेला केविलवाणा खटाटोप मानला जात आहे. स्थानिक पातळीवर जनाधार आणि पकड दोन्ही गमावलेल्या मिस्टर रामराजेंची ही मध्यरात्रीची कसरत जिल्हा बँकेच्या आडून केवळ राजकीय संजीवनी मिळवण्याचा व्यर्थ प्रयत्न असल्याची जोरदार चर्चा आता साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मिस्टर रामराजेंची मध्यरात्री धावपळ
शेखर गोरेंसोबतच्या गुप्त भेटीने मिस्टर रामराजेंचे जिल्हा बँकेत केविलवाणे 'मसल फ्लेक्सिंग '
by Team Satara Today | published on : 06 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा