सातारा : अंबवडे, ता. खटाव येथे महिलेच्या विनयभंग व मारहाण दाखल गुन्ह्यात आरोपीच्या विरोधात वडूज पोलिसांनी ४८ तासात दोषारोपपत्र दाखल केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंबवडे ( ता. खटाव ) २४ ऑगस्ट रोजी सकाळी एका महिलेचा विनयभंग प्रकार घडला. त्याचा जाब विचारण्यासाठी सदर महिला व तिचे पती आरोपीच्या घरी गेले होते. त्यादरम्यान आरोपी, त्याचा भाऊ व पुतण्या यांनी शिवीगाळ व दमदाटी करून आरोपीच्या पुतण्याने पीडित महिलेच्या पतीच्या डोक्यात लोखंडी खोरे मारून जखमी केले. याबाबत वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपअधिक्षक रणजित सावंत, पो. नि. घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्ह्याची गंभीर दखल घेवून बिट हवालदार यांना सूचना केली. हवालदार एम एम काटकर यांनी तपास गतिमान करून पंचनामा करून ४८ तासात दोषारोपपत्र दाखल केले.
पो. ह. सत्यवान खाडे, सागर बदडे, जयदीप लवळे, सुभाष पळे आदींनी याकामी सहकार्य केले.