चार वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्‍मठेपेची शिक्षा; सातारा तालुका पोलिसांची अभिनंदनीय कामगिरी

by Team Satara Today | published on : 01 April 2026


सातारा : भल्‍या पहाटे दुचाकीवरुन येवून फिरस्‍ती असलेल्‍या अवघ्या ४ वर्षीय मुलीचे अपहरण करुन सोनगाव येथे निर्जनस्‍थळी तिच्यावर अमानुष अत्‍याचार झालेल्‍या सातार्‍यातील घटनेत मुलीला न्‍याय मिळाला. सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर घडलेल्‍या या घटनेतील आरोपी संकेत स्‍वरुप गुजर (वय २५, रा. मंगळवार पेठ, सातारा) याला जन्‍मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

२१ मार्च २०२२ रोजी संतापजनक ही घटना घडली होती. सोनगाव येथे पहाटे फिरायला जाणार्‍या नागरिकांना रक्‍तबंबाळ अवस्‍थेत विव्‍हळत पडलेली मुलगी दिसली. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्‍काळ सातारा तालुका पोलिस तेथे पोहचले. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर अत्‍याचार झाल्‍याचे स्‍पष्ट झाले. सातारा तालुका, शहर पोलिसांनी जंगजंग पछाडून तपास करुन संकेत गु्जर याला अटक केली. पोनि विश्वजीत घोडके यांनी तपास करुन तत्‍कालीन आयपीएस आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली न्‍यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

न्‍यायालयात दोन्‍ही पक्षाच्यावतीने युक्‍तिवाद झाला. सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. ज्योती दिवाकर यांनी केलेला युक्‍तिवाद ग्राह्य धरुन अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश ३ सानिका जोेशी यांनी आरोपीला जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली. प्राॅसिक्‍युशन स्‍कॉडचे महिला पोलिस शीतल भोसले व तेजा तुपे यांनी सहकार्य केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
झाडाच्या फांद्या तोडताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
पुढील बातमी
स्वमग्न मुलांच्या पालकांसाठी साताऱ्यात मोफत कार्यशाळा; आनंदवन शाळेत 5 एप्रिल रोजी आयोजन

संबंधित बातम्या