पुणे महापालिकेचा बालगंधर्व पुरस्काराबाबत मोठा निर्णय

पुणे :  नटसम्राट बालगंधर्व यांच्या जन्मदिनानिमित्त पुणे महापालिकेने दरवर्षी ज्येष्ठ कलाकारास बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नाट्य क्षेत्रातील पाच कलाकारांचा सत्कारही केला जातो. कोरोनाच्या पूर्वी हा पुरस्कार दिला जात होता, पण कोरोनानंतर पुरस्कार वितरण करण्यात आलेला नाही.

पुणे शहर सांस्कृतिक राजधानी आहे, तेथे कलाकारांचा सन्मान केला जावा यासाठी महापालिकेने बालगंधर्व पुरस्कार देण्यास सुरुवात केली. पण 2020  आणि 2021 या वर्षातला पुरस्कार जाहीर करून चार वर्ष सरली तरीही महापालिकेला या पुरस्कारचे वितरण करण्याचा विसर पडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने नुकतेच महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना यासंदर्भात निवेदन देऊन पुरस्काराची आठवण करून दिली आहे.

मनसेचे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखाली शहर सचिव रमेश जाधव, रवी सहाणे, मनविसेचे सारंग सराफ, श्रीनिवास दिसले यांनी हे निवेदन दिले. यावेळी आयुक्तांनी लवकरच कार्यक्रम आयोजित करून कलाकारांना पुरस्काराने सन्मानित केले जाईल असे आश्वासन दिले आहे, असे बाबर यांनी सांगितले.

दरम्यान, संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे यांना 2020 मध्ये आणि शास्त्रीय गायिका डॉ. रेवा नातू यांना 2021  चा बालगंधर्व पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या दोन्ही कलाकरांना अद्याप गौरविले नाही तसेच पुरस्कार देण्यास विलंब का झाला आहे हे देखील कळविण्यात आलेले नाही. राज्याची सांस्कृतिक राजधानीत असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असे वागस्कर यांनी सांगितले.


पुणे महापालिकेने आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल उंचावण्यासाठी ‘मेंटल हेल्थ ॲप’ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी सव्वाकोटी रुपयांचा निधी कंपन्यांकडून मिळालेल्या कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून खर्च केला जाणार आहे. या ॲपद्वारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मानसिक तणाव व्यवस्थापनास मदत होईल. तसेच, त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

सुरुवातीला या ॲपचे दोन हजार युनिट्स खरेदी करण्यात येणार आहेत. हा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. मान्यता मिळाल्यानंतर खरेदी प्रक्रिया सुरू होईल.महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सुमारे १७ ते १८ हजार कर्मचारी कार्यरत असून, त्यांना मानसिक व शारीरिक तणावाचा सामना करावा लागतो.

महापालिकेने आधीपासूनच कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये आरोग्य तपासणी, आरोग्यविषयक मार्गदर्शन, योग व अन्य शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी कार्यक्रमांचा समावेश आहे.

या ॲपसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या, ज्यामधून टचकिन ई-सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीची निवड करण्यात आली आहे, कारण त्यांची निविदा सर्वांत कमी दराची होती.

मागील बातमी
कराड मध्ये भर दिवसा घरफोडी
पुढील बातमी
श्री यमाई देवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साहात

संबंधित बातम्या