सातारा : अपघातात एकास जखमी केल्याप्रकरणी बोअरवेल ट्रक चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 रोजी पावणेचार वाजण्याच्या सुमारास राजेंद्र धनाजी घोटकर रा. दरे खुर्द, सातारा यांच्या दुचाकीला समोरून धडक देऊन त्यांना जखमी केल्याप्रकरणी बोअरवेल ट्रक क्र. एमएच 11 डीए 4399 वरील चालक रमेश एस मूळ रा. कट्टू कोटाई, किरपट्टी, अत्तुर, सालेम, राज्य तामिळनाडू. सध्या रा. एमआयडीसी सातारा याच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.