प्रतापसिंहनगर येथे चालत जाणाऱ्यास दुचाकीची धडक; दुचाकी चालकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 01 April 2026


सातारा :  प्रतापसिंहनगर येथे मेडिकल कॉलेज समोर पायी चालत जाणाऱ्या नरेश शामराव बोकेफोडे (वय ५२ रा. प्रतापसिंहनगर,खेड) यांना मोटरसायकल चालक मनोज वसंत गायकवाड (रा. सुविधा अपार्टमेंट सातारा) यांनी जोराची धडक दिल्याने त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. याप्रकरणी दुचाकी चालक मनोज गायकवाड यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्वमग्न मुलांच्या पालकांसाठी साताऱ्यात मोफत कार्यशाळा; आनंदवन शाळेत 5 एप्रिल रोजी आयोजन
पुढील बातमी
साताऱ्यात मल्हारपेठ येथे रेशनिंग दुकानातून सोन्याच्या चेनची नातवाकडून चोरी

संबंधित बातम्या