जालन्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ७ महिलांचा मृत्यू, ४ जण गंभीर

by Team Satara Today | published on : 01 April 2026


जालना: समृद्धी महामार्गावरील जामवाडी शिवारात आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ट्रकने एका पिकअपला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात सात महिलांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही पिकअप गाडी एका कंत्राटदाराची होती. समृद्धी महामार्गावर गवत काढण्याचे काम करणाऱ्या महिलांना घेऊन जाण्यासाठी ही गाडी महामार्गावर थांबलेली असताना, नागपूरहून येणाऱ्या ट्रकने तिला पाठीमागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअपचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, अपघातातील मृत महिलांचे साहित्य महामार्गावर विखुरले गेले होते.

​अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या अपघातातील मृत महिला बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे निलंबित; विभागीय चौकशीचे आदेश
पुढील बातमी
इराण युद्धात मित्रराष्ट्रांनी साथ न दिल्याने डोनाल्ड ट्रम्प संतप्त; अमेरिकेचा 'नाटो'तून बाहेर पडण्याचा इशारा

संबंधित बातम्या

भीषण स्फोटाने तासवडे एमआयडीसी परिसर हादरला; एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट तासवडे : तासवडे एमआयडीसीमधील (ता. कराड) एसकेएस केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी आठ कमी तीव्रतेचे स्फोट झालेे. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावांतील ग्रामस्थांच्या अक्षरशः कानठळ्या बसल्या. तसेच, परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. एमआयडी