आइडियल इंटरनॅशनल स्कुल च्या डॉ. वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ जाहीर; विविध स्तरावरुन अभिनंदन

by Team Satara Today | published on : 22 January 2026


फलटण  :  शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व आणि आइडियल इंटरनॅशनल स्कुल च्या मुख्य प्रवर्तका डॉ. वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव व आयुष्यभराचे उल्लेखनीय योगदान यासाठी हा मानाचा पुरस्कार देण्यात येत आहे.

हा पुरस्कार प्रदान सोहळा दि. ३१ मार्च २०२६ रोजी ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन (WHRPC) मेंबरशीप सेमिनार दरम्यान आयोजित करण्यात येणार असून, या कार्यक्रमात डॉ. शिंदे यांचा सन्मान इतर मान्यवर व्यक्तिमत्त्वांसह करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर, राजदूत, सरकारी मंत्री तसेच बॉलिवूड क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित राहणार असून, हा सोहळा जागतिक स्तरावरील ओळख व सन्मानाचे व्यासपीठ ठरणार आहे.

याशिवाय, डॉ. वैशाली शिंदे यांची वर्ल्ड ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन (WHRPC) यांच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना वर्ल्ड ह्युमन राइट्स प्रोटेक्शन कमिशन (WHRPC) ची आजीवन सदस्यता देखील प्रदान करण्यात येणार असून, मानवाधिकार व सामाजिक कार्यासाठी कार्यरत असलेल्या जागतिक नेतृत्वाच्या समूहात त्या सहभागी होणार आहेत.

भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल ही भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त व अधिकृत पुरस्कार देणारी संस्था आहे. या संस्थेचे पुरस्कार भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय तसेच कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय यांच्या मान्यतेने प्रमाणित आहेत. डॉ. वैशाली शिंदे यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील अथक परिश्रम व योगदानाची पावती आहे. ही गौरवाची बाब केवळ त्यांच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानास्पद आहे. त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या सौ. प्रियदर्शनी भोसले; स्वीकृत सदस्यपदी श्रीमंत अनिकेतराजे निंबाळकर,सुदामराव मांढरे आणि अशोकराव जाधव
पुढील बातमी
भारतीय लोकशाही अमृत महोत्सव राष्ट्रीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर; विद्यालय गटात वडूजची कल्याणी घाडगे, महाविद्यालयीन गटात वाशी-नवी मुंबईची अनुराधा गायकवाड तर खुल्या गटात मायणीचे प्रकाश भोंगाळे प्रथम

संबंधित बातम्या