सातारा नगरपालिकेचा पाणी कपातीचा निर्णय; १५ एप्रिलपासून पाणीपुरवठ्यात कपात; आठवड्यातून एक दिवस बंद

नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा - नगराध्यक्ष अमोल मोहिते

by Team Satara Today | published on : 13 April 2026


सातारा : उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे सातारा शहरातील पाणीपुरवठ्यावर ताण निर्माण झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास व शहापूर योजनांतील टाक्या पूर्ण क्षमतेने भरण्यास विलंब होत असल्याने सातारा नगरपालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी बुधवार, दि. १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

पालिकेने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकानुसार, कास व शहापूर योजनांद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या प्रत्येक पेठेचा पाणीपुरवठा आठवड्यातून एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती ॲड. दत्तात्रय बनकर आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांनी केले आहे.

कास योजना (वारनिहाय कपात):

सोमवार — पेठ शुक्रवार, गडकर आळी परिसर

मंगळवार — बोगदा, पॉवर हाऊस, व्यंकटपुरा, धननीची बाग, करंडबी नाका, पोळ वस्ती, चिमणपुरा पेठ

बुधवार — मनामती चौक, गुजर आळी, चिमणपुरा, ढोणे कॉलनी

गुरुवार — भटजी महाराज मठ, रामाचा गोट, गवंडी आळी, मंगळवार तळे, कोल्हटकर आळी, नागाचा पार, पद्मावती मंदिर परिसर, होलार समाज मंदिर परिसर, मंगळवार पेठ, ठक्कर कॉलनी, बोगदा ते समर्थ मंदिर, धस कॉलनी, दस्तगीर नगर, संत कबीर सोसायटी, पोळवस्ती

शुक्रवार — पापाभाई पत्रेवाला चाळ, चिमणपुरा पेठ, गारेचा गणपती, मनामती चौक, नागाचा पार, संत कबीर सोसायटी, पोळवस्ती

शनिवार — शुक्रवार पेठ, प्रतापगंज पेठ, बुधवार नाका, नामदेव वाडी

रविवार — अदालतवाडा, माची पेठ, बोगदा परिसर, बालाजी अपार्टमेंट, कांबळे वस्ती, जांभळे वाडा, जंगी वाडा, गोल मारुती ते राजवाडा लाईन

शहापूर योजना (वारनिहाय कपात):

सोमवार — यशवंत गार्डन (दोन्ही झोन), मल्हार पेठ, बडेकर वस्ती, ढोर गल्ली, नकाशपुरा, शनिवार पेठ परिसर

मंगळवार — कुंभार वाडा, कोलाटी वस्ती, चारभिंती टाकी परिसर

बुधवार — गणेश टाकी (दोन्ही झोन), समर्थ मंदिर ते हत्तीखाना, सोमवार पेठ, विष्णू आळी, रेणुका मंदिर परिसर, मंगळवार पेठ

गुरुवार — गुरुवार टाकी (दोन्ही झोन), कूपर कारखाना ते पिसाळ आर्केड, केसरकर पेठ, शनिवार पेठ, वाघाची नळी परिसर

शुक्रवार — करंजे, शेंडे कॉलनी, बाबर कॉलनी, एकता कॉलनी, निसर्ग कॉलनी, बुधवार नाका

शनिवार — घोरपडे टाकी, राजलक्ष्मी परिसर, नालबंद वाडा, कोतवाल वाडा, दत्तमंदिर परिसर, राजसपुरा पेठ, दुर्गा पेठ

रविवार — तांदुळआळी, मोती चौक, देवी चौक, गोरक्षण बोळ, राधिका टॉकीज परिसर

पालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांनी पाण्याचे नियोजन करून वापर करणे गरजेचे असून, अनावश्यक पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यातील वाढे फाटा येथे आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा; संशयितास अटक
पुढील बातमी
साताऱ्यात आंबेडकर जयंतीचा जल्लोष; डॉ. आंबेडकर यांच्या पुतळा परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई

संबंधित बातम्या