कोल्हापूर : राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारे कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे विविध गटांतील शेतकऱ्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात येतो. या वर्षी कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील नऊ शेतकऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये कृषी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोल्हापूर नामदेव परीट यांना २०२४चा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
वसंतराव नाईक कृषिभूषण : अशोक खोत (उरुण-इस्लामपूर, ता. वाळवा)
जिजामाता कृषिभूषण : पुष्पावती भीमराव मिठारी (बुर्ली, ता. पलूस)
कृषिभूषण (सेंद्रिय शेती) : अनंत माने (रहिमतपूर, ता. कोरेगाव)
वसंतराव नाईक शेतीमित्र : अभिजित डाके (काले, ता. कराड)
युवा शेतकरी : प्रतीक पवार (साखराळे, ता. वाळवा)
उद्यानपंडित : बबन मुळीक (सासकल, ता. फलटण)
वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी : हिंमतराव पाटील (पश्चिम सुपने, ता. कराड),
दाजी पाटील (कुंभारी, ता. जत) व अरविंद कल्याणकर (घोळसवडे, पो. चांदाेली, ता. शाहूवाडी)
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न : नामदेव परीट (कृषी उपसंचालक, कोल्हापूर)