मोबाईलची तक्रार करण्यास गेलेल्या ग्राहकाला मारहाण

by Team Satara Today | published on : 03 October 2026


सातारा : दोन महिन्यांपूर्वी खरेदी केलेला मोबाईल हँग होत असल्याने तो दाखविण्यासाठी दुकानात गेलेल्या ग्राहकाला आमच्या दुकानात पुन्हा यायचे नाही असे म्हणत दुकानदाराने शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सातारा शहरातील गुरुवार पेठेत घडली.
ही घटना 1 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास शाही मस्जिदजवळ अतीक शेख यांच्या दुकानासमोर घडली. याबाबत अनिल विजय बडेकर (वय 39, व्यवसाय ड्रायव्हर, रा. मल्हार पेठ, ता. जि. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादीनुसार, तक्रारदाराने सुमारे दोन महिन्यांपूर्वी अतीक शेख यांच्या मोबाईल दुकानातून मोबाईल खरेदी केला होता. हा मोबाईल वारंवार हँग होत असल्याने तो दाखविण्यासाठी तक्रारदार दुकानात गेले होते.
त्यावेळी अतीक अस्लम शेख (रा. एलबीएस कॉलेज शेजारी, सातारा) याने तू इथे आमच्या इथे यायचे नाही, असे म्हणत तक्रारदाराला मारहाण केली तसेच शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी अतीक असलम शेख आणि अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शशिकांत शिंदेंच्या दोन अर्जांनी जिल्हा बँकेतील राजकीय गणिताला धक्का
पुढील बातमी
पोक्सो प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा; एकाला अटक, दोघांचा शोध सुरू

संबंधित बातम्या