सातारा : पगार मागितला म्हणून नोकरावर वार केल्याप्रकरणी मालकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 रोजी 3 वाजण्याच्या सुमारास अब्दुल इमाम सय्यद रा. शाहूनगर, गोडोली, सातारा यांनी विनायक माने रा. खेड, सातारा यांच्याकडे पगार मागितल्याच्या कारणावरून माने यांनी त्यांना शिवीगाळ करून चाकूसारख्या शस्त्राने त्यांच्यावर वार केला. अधिक तपास महिला पोलीस हवालदार माने करीत आहेत.