स्कूलचे शिक्षक-शिक्षिका तसेच स्कूलचे हिंदवीयन्स शिवदौडची मशाल घेऊन माची पेठ पासून अजिंक्यतारा येथे सकाळी 5.30 वा. उपस्थित राहिले. तिथून अजिंक्यतारा पर्यंत ही शिवदौड चालू राहिली. अजिंक्यतारा येथे पोहोचल्यानंतर दुर्गनाद ट्रेकचे अध्यक्ष मा. गणेश बजरंग शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शिव दुर्ग, अजिंक्यतारा, सातारा मधील ऐतिहासिक वास्तू यांचे जतन करण्यास सांगून छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
अजिंक्यतारा येथे सकाळी 7 वाजता मशाल प्रज्वलित करण्यात आली. छोट्या हिंदवीयन्सनी मशाल हातात घेऊन शिवाजी सर्कल, पोवई नाका येथे शिवाजी महाराजांना अभिवादन करून ही दौड नगरपालिका येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
देवी चौक येथे हिंदवी पब्लिक स्कूलच्या पालकांनी मशालीचे पूजन केले. पुढे जाऊन राजवाडा येथे प्रतापसिंह महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ही दौड शाहूपुरी मार्गे शाळेमध्ये दाखल झाली.
स्कूलच्या विद्यार्थिनींनी पारंपारिक वेशभूषा मध्ये शिवज्योतीचे औक्षण केले. संस्थेचे अध्यक्ष अमित कुलकर्णी सर, हिंदवी पंचकोशाधारित गुरुकुलच्या कार्यकारी संचालिका सौ. रमणी कुलकर्णी, प्रिन्सिपल सौ. मंजुषा बारटक्के, वाईस प्रिन्सिपल सौ.शिल्पा पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच हिंदवीयन्स यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचे पूजन केले. स्कूलच्या शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी शिवस्तुती सादर केली. तसेच स्कूलचा विद्यार्थी आर्यन जाधव याने शिवगर्जना केली.
शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिवदौडमध्ये मोठ्या उत्साहाने सहभाग घेतल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमित कुलकर्णी सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. अशाप्रकारे हिंदवी पब्लिक स्कूल मध्ये शिवजयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.