मुंबईत फर्निचर गोदामांना भीषण आग

मुंबई : मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतल पश्चिम उपनगरातील फर्निचर गोदामांना आग लागली आहे. गोरेगाव पूर्व परिसरातील खडकपाडा येथील फर्निचर मार्केटमध्ये ही आग लागली आहे. फर्निचरच्या चार ते पाच गोदामांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून करण्यात येत आहेत.

खडकपाडा फर्निचर मार्केट येथील गोदामांना शनिवारी (25 जानेवारी) सकाळच्या सुमारास आग लागली. आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला 11 वाजून 19 मिनिटांनी मिळाली. त्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाच ते सहा गोदामांना ही आग लागली आहे. गोदामांमध्ये फर्निचर असल्याने आग झपाट्याने पसरत आहे. आग इतकी भीषण आहे की, आगीच्या मोठ-मोठ्या ज्वाळा दिसून येत आहेत. तर संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले आहे. दूरवरुन धुराचे लोट दिसून येत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या ठिकाणी हे फर्निचर गोदाम आहेत त्या परिसरात रहिवासी वस्ती सुद्धा आहे. आग झपाट्याने पसरत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने आसपासचा परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. फर्निचरमुळे आग वेगाने पसरत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरू आहेत.

या आगीत गोदामांमधील फर्निचर पूर्णपणे जळून खाक झाले आहे. अत्यंत भीषण स्वरुपाची ही आग आहे. फर्निचरमुळे आग आणखी भडकत आहे. ज्या परिसरात आग लागली आहे तो परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळेच अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात काही प्रमाणात अडचणी येत आहेत.

मागील बातमी
खंडाळा जि. प. शाळेत मुकुल माधव फाउंडेशनचे आरोग्य तपासणी शिबिर
पुढील बातमी
जगातील सर्वात उंच ब्रिजवरून धावली भारतीय रेल्वे

संबंधित बातम्या