वीस हजारांच्या खंडणीसाठी उद्योजकास मारहाण करणाऱ्या लल्लन जाधवसह चौघांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 26 April 2026


सातारा  : सातारा शहरातील कुख्यात गुंड लल्लन जाधव व सहकाऱ्यांवर वीस हजारांच्या खंडणीप्रकरणी उद्योजकास मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अनिकेत बापू गायकवाड (रा. सातारा) यांनी याबाबत तक्रार पोलिसांत दिली आहे. त्यानुसार लल्लन उर्फ अजय दत्तात्रय जाधव (वय १९), सिध्दार्थ सचिन मिसाळ व अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारासा लल्लन जाधव व सहकाऱ्यांनी अनिकेत गायकवाड यांस २० हजार रुपयांची खंडणी मागत मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सपोनि. बिले हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात जुना मोटार स्टॅण्ड परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा; दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
वासोळे येथे घरफोडीत ६५ हजारांचे दागिने लंपास

संबंधित बातम्या