बोलण्याचा बहाणा करून अनोळखीने केली १० ग्रॅम सोन्याची चेन लंपास; खिंडवाडी येथील घटना

by Team Satara Today | published on : 19 May 2026


सातारा : खिंडवाडी येथे बोलण्याचा बहाणा करून एका अनोळखीने १० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरोधात सातारा शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील दत्तात्रय यादव (वय ५३, रा. शेरेवाडी, कुमठे, ता. जि. सातारा) हे दि. १६ रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास शिवराज पेट्रोल पंप ते खिंडवाडी रस्त्याने जात असताना रॉयल अकॅडमी येथील सर्विस रोडवर आपल्या कारमध्ये थांबले होते. यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला व बोलण्याचा बहाणा करू लागला. संभाषणात गुंतवून त्या इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची, अंदाजे ५० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन त्यांच्या संमतीशिवाय लबाडीने चोरी करून पळ काढला.

या घटनेनंतर फिर्यादी यांनी सातारा शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. पोलीसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास मपोहवा कदम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निशांत पाटील हाजीर हो......भाजपाचा पहिला नगरसेवक गळाला; अपात्रतेप्रकरणी २ जूनला सुनावणी
पुढील बातमी
लिंब येथे जेसीबी नेण्याच्या वादातून मारहाणप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा

संबंधित बातम्या