लोणंद : लोणंद शहरातील आठवडे बाजारात मोबाईलची चोरी करणार्या दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 60 हजार रुपये किमतीचे 20 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. करुडसिंह भगवानसिंह राठोड (वय 28), कांचु सोनु गुजर (वय 22, दोघेही सध्या रा. पुणे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
लोणंद शहरातील गुरुवारच्या आठवड्या बाजारातून काही नागरिकांचे मोबाईल चोरी झाल्याने लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलिसांकडून सुरू होता.
तपासादरम्यान संशयितांना ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 4 मोबाईल आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे 20 मोबाईल मिळून आले. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक रोहित हेगडे, सहा. पोलिस उपनिरीक्षक विष्णु धुमाळ, विजय पिसाळ, हवालदार धनाजी भिसे, नितीन भोसले, राहुल मोरे, सतिश दडस, बापुराव मदने, विठ्ठल काळे, अंकुश कोळेकर, अमोल जाधव, अवधुत धुमाळ, सचिन कोळेकर, शेखर शिंगाडे, जयवंत यादव, संजय चव्हाण, स्नेहल कापसे, राणी कुदळे, अश्विनी माने, आशा शेळके, भारती मदने, लता निकम, रुतुजा शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला.