कारंडवाडी येथील बसस्टॉप जवळ मारहाणप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी

by Team Satara Today | published on : 11 November 2025


सातारा : कारंडवाडी येथील बसस्टॉप जवळ एकमेकांना मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवीगाळ का केली, असे विचारल्याच्या कारणातून एकमेकांना हाताने, लाथा बुक्क्याने व दगडाने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी रोहित तानाजी सावंत (वय २२), सतीश बबन साळुंखे (वय ४५), राज सतीश साळुंखे, आदित्य संतोष साळुंखे, तानाजी छत्रपती साळुंखे (सर्व रा. कारंडवाडी)  यांनी एकमेकांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलीसांनी दिली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सदरबाजारमध्ये जुन्या भांडणाच्या कारणातून एकावर कोयत्याने हल्ला
पुढील बातमी
वाढे फाटा येथे झालेल्‍या अपघातप्रकरणी पिकअप चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या