12:32pm | Oct 02, 2024 |
सातारा : वयाचा आणि आजारांचा आता काहीही संबंध राहिलेला नाही. अवघ्या पंचविशीत हृदयविकाराचा झटका आणि चाळिशीत मोतीबिंदूचे ऑपरेशन हे बदलत्या खानपान आणि जीवनशैलीचा परिणाम आहे. शरीराला जडलेल्या आजाराचा स्वीकार केला, तर त्यावर तातडीने उपचार घेऊन या आजारावर नियंत्रण मिळवता येते, असे प्रतिपादन ज्येष्ठ हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी केले.
येथील सातारा क्लबच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ये दिल का मामला है' या संवाद कार्यक्रमात डॉ. साबळे बोलत होते. विचारमंचावर पोटविकार तज्ज्ञ डॉ. प्रतापराव गोळे व प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. कमलेश पिसाळ यांची उपस्थिती होती. सातारा येथे हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे आणि पोटविकार तज्ज्ञा डॉ. प्रतापराव गोळे यांच्याशी संवाद साधताना अॅड. कमलेश पिसाळ, जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात क्लब सदस्यांसह सातारकर उपस्थित होते.
डॉ. प्रतापराव गौळे म्हणाले, वयाच्या साठीपर्यंत घर, गाडी, परदेश सहल करण्याची नियोजन असणारी पिढी आता अस्तित्वात नाही. आयुष्याची गती तरुणाईने इतकी वाढवली आहे की, तिशीत असताना साठीचे यश मिळवायचे आहे. हे यश मिळवताना आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही मोठी हानिकारक बाब त्यांच्या लक्षात येत नाही. परिणामी कुठे थांबावे हेही आता ठरवता आले पाहिजे.
डॉ. साबळे म्हणाले, वैद्यकीय तज्ज्ञांनी आजार सांगितल्यानंतर है आपल्याला होणे शक्य नाही, असे म्हणण्यापेक्षा यावर उपाय काय, हा प्रश्न विचारला, तर किचकट पातळी गाठणारे आजारही वेळेत नियंत्रणात आणता येतात. या कार्यक्रमास डॉ. चंद्रशेखर घोरपडे, विशाल ढाणे, भाग्यश्री ढाणे, डॉ. पल्लवी पीसाळ, संध्या चौगुले, सतीश बुद्धे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यामध्ये चुरशीने 69 टक्के मतदान |
याच साठी केला होता अट्टाहास! |
जिल्ह्यात मतदानासाठी येणार्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी |
पूर्णाहूतीने सज्जनगडावर विष्णू पंचायतन यागाची सांगता |
शिर्डीहून साईंच्या पालखीचे येत्या २९ नोव्हेंबरला प्रस्थान |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये साताऱ्याच्या शर्वरी राठोड ला रौप्य पदक |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा |
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या |
युवती बेपत्ता |
एसटी बसचे स्टेअरिंग निवडणूक आयोगाच्या हातात |
3348 परवाना प्राप्त अग्निशस्त्र जिल्हा प्रशासनाकडे जमा |
सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये साहित्याचे वाटप |
गेट टुगेदरने घडवला मैत्रीचा पुनर्जन्म |
पं.जयतीर्थ मेऊंडीच्या बहारदार गायनाने श्रोते झाले मंत्रमुग्ध |
राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हद्दपारीची एकतर्फी कारवाई; आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह कार्यकर्ते आक्रमक |
'उमेद'ने केले पावणे दोन लाख कुटुंबांचे समुपदेशन |
आचार संहितेचा भंग केल्यास कडक कारवाई : जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
महायुतीचे नेते विश्वासात घेत नसल्याची रयत क्रांती संघटनेची तक्रार |
कराड दक्षिणमधील जनता फालतू माणसाला संधी देत नाही : माजी आ. रामहरी रूपनवर |
मतदार जागृती प्रश्नमंजुषा स्पर्धा कोरेगाव येथे उत्साहात! |