सातारा पालिकेसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती

by Team Satara Today | published on : 10 November 2025


सातारा : सातारा नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून सातारा नगर पालिकेसाठी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती उद्या सोमवार दि. १० रोजी सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत हॉटेल फर्न, सातारा येथे घेण्यात येणार आहेत. 

नगरसेवक पदासाठी सकाळी ९ ते १०.३० यावेळेत प्रभाग क्र. १ ते ६, सकाळी १०.३० ते दुपारी १२ पर्यंत प्रभाग क्र. ७ ते १२, दुपारी १२ ते १.३० यावेळेत प्रभाग क्र. १३ ते १८ आणि दुपारी १.३० ते ३ यावेळेत प्रभाग क्र. १९ ते २५ या प्रभागासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तसेच दुपारी ३ ते ३.३० यावेळेत नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, सातारा शहर निवडणूक प्रभारी विकास गोसावी, ऍड. दत्तात्रय बनकर व इतर पदाधिकारी घेणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आलेला अर्ज भरून त्याच्या तीन झेरॉक्स सोबत घेऊन वेळेच्या १५ मिनिट अगोदर मुलाखत स्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्यावतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेंद्रे गावच्या हद्दीत विदेशी दारूसह स्विफ्ट कार जप्त; तब्बल साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
मलकापूरच्या विकासासाठी भाजप प्रवेशाचा निर्णय; मनोहर शिंदे : प्रलंबित विकासकामांसाठी त्वरित ५१ कोटी रुपयांच्या निधीची गरज

संबंधित बातम्या