सातारा : माण तालुक्यातील वरकुटे गावच्या हद्दीतील तुपेवाडी गांजाच्या झाडांची लागवड करुन जोपासना करणाऱ्या शहाजी दाजी तुपे (वय 65, रा. तुपेवाडी, ता. माण) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या शेतातील 10 लाख 11 हजार 950 रुपये किंमतीचा 40 किलो गांजा जप्त करण्यात आला असून ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुपेवाडीत गांजा लागवड केली असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सातारा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी माहिती प्राप्त करुन घेतल्यावर पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकास कारवाई करण्याच्या सूचना केली.
तपास पथकाने तुपेवाडीत छापा टाकला असता शहाजी तुपे यांनी त्यांच्या शेतात 40 गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे समोर आले. 40.478 किलो वजनाचा 10,11,950 रुपये किंमतीचा ओला गांजाची लागवड केलेली झाडे, गांजाची हिरवट पाने फुले, बारीक काडया व बीज असलेली ओलसर पाने सुकत घातल्याचे मिळुन आले. त्यांच्या विरोधात म्हसवड पोलीस स्टेशन गुरनं 327/2025 एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8,20 (ब) (2) (क), 22(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या काारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर सातारा यांनी कारवाई पथकामधील पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि रोहित फार्णे, पोउनि विश्वास शिंगाडे, पोउनि परितोष दातीर, म्हसवड पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनावने, पोउनि अनिल वाघमोडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार अतिश घाडगे, शिवाजी गुरव, सचिन साळुंखे सनी आवटे, अमित सपकाळ, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, धिरज महाडीक, म्हसवड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अमर नारनवर, शशिकांत खाडे, रुपाली फडतरे, अभिजीत बहाद्दले, राहुल थोरात, वसिम मुलानी व फॉरंन्सीक टीम यांचे विशेष अभिनंदन केले.