सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहर सह तालुका पोलिसांनी सात जणांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुका पोलिसांनी नदीम नसीर सय्यद रा. बुधवार पेठ, सातारा आणि शशिकांत हनुमंत खरे रा. बोरगाव, ता. सातारा यांच्यावर कारवाई केली आहे, तर सातारा शहर पोलिसांनी सुमित परशुराम बनसोडे रा. म्हसवे ता. सातारा, विशाल सुभाष बनसोडे रा. वनवासवाडी सातारा, असलम खाजामिया शेख रा. गेंडामाळ सातारा, सुरज बाळू होंडे रा. प्रतापसिंह नगर सातारा आणि अशपाक गुलाब शेख रा. सदर बाजार सातारा यांच्यावर कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून एकूण 3900 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.