सातारा : शिरढोण येथून सातारा शहराकडे जात असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात सयाजी मारुती धनवे (रा. शिरढोण, ता. कोरेगाव,जि. सातारा) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याची फिर्याद पुतण्या यश संभाजी धनवे (वय २२) याने शहर पोलिसांत दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सयाजी धनवे हे दि १८ रोजी सायंकाळी ५.२०च्या सुमारास मोटारसायकल वरून शिरढोणहून साताऱ्याकडे येत होते. क्षेत्रमाहुली (ता. जि. सातारा) येथील बसस्थानकाजवळ रस्त्यावर साचलेल्या खडीमुळे त्यांची दुचाकी घसरली. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन दुचाकीसह खाली पडले.
अपघातानंतर त्यांना तात्काळ सातारा येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना शनिवार, दि. १९ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल करत आहे.