कोंडवेत ४४ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; अकस्मात मृत्यूची नोंद

by Team Satara Today | published on : 22 June 2026


सातारा : सातारा तालुक्यातील कोंडवे गावात एका ४४ वर्षीय व्यक्तीने राहत्या ठिकाणी गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल मोहनराव गुरव (वय ४४, रा. कोंडवे, ता. जि. सातारा) यांनी साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी अभयसिंह शिवाजीराव कोकिळ (रा. करंजे, ता. जि. सातारा) यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सहाय्यक फौजदार माने अधिक तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
व्यंकटपुरा पेठ परिसरात एका घरातून ४३ हजारांची रोकड गायब; घरकाम करणाऱ्या महिलेवर संशय
पुढील बातमी
वाढे गावातून मोटर सायकलची चोरी

संबंधित बातम्या