सातारा : उत्तेकर नगर मध्ये अज्ञात चोरट्यांनी 55 हजारांची घरफोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 ते 25 दरम्यान मुस्ताक रहमान शेख रा. उत्तेकर नगर, सातारा यांच्या बंद घराच्या दरवाज्याचा कोयंडा कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याची अंगठी, रोख रक्कम, पासपोर्ट आणि एफडीच्या पावत्या असा एकूण 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
उत्तेकर नगर मध्ये 55 हजारांची घरफोडी
by Team Satara Today | published on : 27 December 2024