राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाच्यावतीने घेतल्या 120 उमेदवारांच्या मुलाखती; राजकीय चाचपणीला उमेदवारांचा जोरदार प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 17 January 2026


सातारा : राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाच्या वतीने पोवई नाक्यावरील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये दिवसभर झालेल्या मुलाखत सत्रामध्ये 120 जणांनी मुलाखती दिल्या .राष्ट्रवादी भवन परिसरामध्ये दिवसभर आज उमेदवारांची गर्दी होती .राष्ट्रवादीचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन काका पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या मुलाखती पार पाडल्या.

सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे 65 गट आणि 130 गणांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 16 जानेवारीपासून सुरू झाली आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने आपली मूर्ती बांधणी करण्याच्या दृष्टीनेशुक्रवारी मुलाखतींचा कार्यक्रम आयोजित केला होता .या मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुमारे 400 हून अधिक उमेदवारांनी उपस्थिती दर्शवली. 

पहिल्या दिवशी कराड, वाई, सातारा, जावली, फलटण या पाच तालुक्यातून सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सुमारे 120 उमेदवारांनी मुलाखत दिल्याची माहिती आहे. मदत वपुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन काका पाटील, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर सचिव श्रीनिवास शिंदे, माजी झेडपी अध्यक्ष उदय कबुले, प्रदीप विधाते, स्मिता देशमुख इत्यादी यावेळी उपस्थित होते. 


उमेदवाराची सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी त्यांचा राजकीय कामाचा अंदाज उमेदवारी का प्राप्त करावयाची आहे त्याची कारणे सर्व गोष्टी या मुलाखतींमध्ये जाणून घेण्यात आल्या. शनिवारी उर्वरित तालुक्यांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत .या राजकीय चाचणीचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना पाठवण्यात येणार आहे


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
४० हजार रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
पुढील बातमी
पालकमंत्री शंभूराज देसाई यांची गुगली राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय; पुणे-बंगळुरू महामार्गावर शंभूराज देसाई आणि खा. उदयनराजे भोसले यांची गळाभेट

संबंधित बातम्या