03:08pm | Jan 07, 2025 |
अयोध्या : अयोध्येतील राम मंदिरामध्ये सुरक्षाव्यवस्थेतील फार मोठी चूक समोर आली आहे. येथे एक व्यक्ती आपल्या चष्म्यामध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामधून फोटो काढण्यास मनाई असलेल्या मंदिराच्या अंतर्भागातील फोटो काढत होता. दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अटक केली आहे. तसेच आता गुप्तचर यंत्रणांकडून त्याची चौकशी सुरू आहे. तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांनीही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी एक जण रामललांचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आला होता. त्याने छुपे कॅमेरे लावलेला चष्मा लावला होता. एवढंच नाही तर या चष्म्यासह त्याने मंदिरा परिसरातील सर्व सुरक्षा पॉईंट विनाअडथळा पार केले होते. मात्र सुरक्षा रक्षक त्याला पकडू शकले नव्हते. त्यानंतर या व्यक्तीने राम मंदिर परिसरामध्ये फोटो काढण्यास सुरुवात केली. जेव्हा तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्याला फोटो काढताना पाहिले, तेव्हा त्याला तातडीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला गुप्तचर यंत्रणांच्या हवाली करण्यात आले. या व्यक्तीने डोळ्यांवर लावलेल्या चष्म्याच्या फ्रेमच्या दोन्ही टोकांवर कॅमेरे लावलेले होते. त्यामुळे त्याला सहजपणे फोटो काढता येत होते.
दरम्यान, गतवर्षी जानेवारी महिन्यात अयोध्येतील रामललांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली होती. तेव्हापासून दररोज हजारो लोक रामललांच्या दर्शनासाठी अयोध्येत येत असतात. दरम्यान, राम मंदिर हे संवेदनशील ठिकाण असल्याने तिथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |

एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |