सातारा शहरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे

by Team Satara Today | published on : 22 January 2025


सातारा : सातारा शहर परिसरात विविध तीन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकून संबंधितांवर गुन्हे दाखल केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अजय सुमंत आरकडे (वय 27, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्यावर जुगार घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याच्याकडून रोख 720 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. धनगरवाडी येथे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

दुसर्‍या घटनेत, निनाद भरत सुरगुडे (वय 19, रा. मोळाचा ओढा, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 500 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई बॉम्बे रेस्टॉस्ट परिसरात केली आहे.

तिसर्‍या घटनेत, महेश दत्तात्रय साळुंखे रा. मंगळवार पेठ व ईश्‍वर दत्तात्रय सावंत रा. शनिवार पेठ सातारा यांच्यावर जुगार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 643 रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई गोडोली नाका परिसरात करण्यात आली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा बसस्थानक परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण
पुढील बातमी
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहाजणांवर गुन्हा

संबंधित बातम्या