सातारा : वृध्द निवृत्त अधिकार्याला जबरी चोरी करुन लुटल्याप्रकरणी दोन अज्ञातांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 17 जुलै रोजी घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वृध्द घरात असताना दोन अनोळखी तेथे आले. ’तुम्ही अश्लील चाळे करत बसलाय. तुमचे शुटींग आमच्याकडे आहे. सोने द्या नाहीतर फोटो, व्हिडीओ व्हायरल करीन,’ अशी धमकी देत सुमारे 3 लाखाचे सोने जबरदस्तीने चोरुन नेले. तसेच या घटनेबाबत कोणाला माहिती दिल्यास जीवे मारेन, अशी धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.