सातारा : आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नितीन पांडुरंग सोडमिसे रा. रविवार पेठ, सातारा याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले असताना कोणत्याही लेखी परवानगीशिवाय सोडमिसे हद्दपार आदेशाचा भंग करून चारभिंती परिसरात दि. 24 रोजी मध्यरात्री आढळून आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार घोडके करीत आहेत.