सातारा : शेंद्रे (ता. सातारा) येथे महामार्गावर झालेल्या दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुरेशसिंह फुसारामजी राजपुरोहित (वय 39, रा. नागठाणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अपघातानंतर त्यांना तातडीने सातार्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी (दि. 1) त्यांची प्राणज्योत मालवली. याबाबत सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, उपनिरीक्षक गुरव तपास करीत आहेत.
अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू; सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद
by Team Satara Today | published on : 04 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा