सातारा : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव रामचंद्र गोरे (दादा, वय ७६) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी माण तालुक्यातील बोराटवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांच्यावर पुणे येथील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांचे मंगळवारी पहाटेचे सुमारास निधन झाले. बोराटवाडी येथे त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. सायंकाळपर्यंत पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सायंकाळी चारनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भगवानराव गोरे हे बोडके ग्रामपंचायतचे माजी सरपंच होते. त्यांच्या पश्चात अंकुश, जयकुमार, शेखर गोरे ही मुले तर सुरेखा ही कन्या आहे.