सातारा : बारटक्के चौक, सातारा येथे धारदार शस्त्राने हल्ला करुन राडा केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.अथर्व चव्हाण, ओम बर्गे अशी गुन्हा दाखल झालेलयांची नावे आहेत.
या दोघांविरुध्द विरेंद्र विलास बल्लाळ (वय ५५, रा. बुधवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. संकेत विरेंद्र बल्लाळ (वय २९) असे हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. हल्लेखोरांनी १४ मार्च रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास बारटक्के चौक परिसरात हल्ला केला. कुकरी, तलवारीचा हल्ल्यात वापर केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.