सुमारे सव्वा कोटीच्या फसवणूक प्रकरणी तीन जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 09 May 2025


सातारा : सुमारे सव्वा कोटीच्या फसवणूक प्रकरणी तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जून 2024 ते मे 2025 दरम्यान शर्मिला विजयकुमार खंदारे रा. सदर बाजार, सातारा यांना मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करून महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाचा शिक्का व भारतीय राजमुद्रा असलेले पाबलो वाईन्स नावाचे बनावट लायसन खरे असल्याचे भासवून खंदारे यांच्याकडून बँक व रोख स्वरूपात एक कोटी 26 लाख 67 हजार पाचशे रुपये घेऊन त्यांचा विश्वासघात केल्याप्रकरणी सुधीर विठ्ठल राऊत रा. पुणे, रुपेश राजाराम वंजारी रा. कृष्णा नगर सातारा आणि डॉ. शरद दत्तात्रय कुंभार रा. वडूज, ता. खटाव, जि. सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ड्रग्ज इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश
पुढील बातमी
अपघात प्रकरणी चारचाकी चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या