मारहाण प्रकरणी दोन जणांवर गुन्हा

सातारा : दोघांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आसगाव ता. सातारा येथे शिवाजी चंद्रकांत शिंदे आणि चंद्रकांत शिंदे दोघेही रा. आसगाव ता. सातारा यांना तेथीलच हर्षल चंद्रकांत शिंदे आणि संगीता शिंदे या दोघांनी जुन्या वादाच्या कारणातून मारहाण करून जखमी केले आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.


मागील बातमी
अपघात प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
पुढील बातमी
सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा; नऊ जणांवर कारवाई

संबंधित बातम्या