सातारा : मारहाण प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तोशीब उर्फ जुबेर मज्जिद शेख आणि मज्जिद शेख दोघेही रा. सदर बाजार, सातारा यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून तेथीलच लिंगाप्पा देवेंद्र इलगे यांना मारहाण केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिले करीत आहेत.