शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पहाणी

सातारा : सातारा येथील छत्रपती संभाजीमहाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे पहिल्या टप्पयातील काम पूर्ण झाले आहे. या कामाची पहाणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

यावेळी वैद्यकीय महाविद्यलायाचे अधिष्ठाता डॉ. रविंद्रनाथ चव्हाण, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, सदरचे वैद्यकीय महाविद्यालय 100 विद्यार्थी क्षमतेचे व 500 खाटांचे आहे. या महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांमुळे जिल्ह्यातील गरजू व गरीब लोकांना आरोग्य सुविधा चांगल्या मिळणार आहेत. त्यामुळे  महाविद्यालयाची उर्वरित कामे  जलद गतीने पूर्ण करावी.

पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्याचे ही काम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे सांगून जिल्हाधिकारी पाटील यांनी आत्तापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना किती निधी आला, खर्च किती झाला, याची माहिती घेतली. स्टाफ क्वॉटर,  कॅंटींगची पहाणी केली. बांधकामाबाबत कोणतीही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क करावा, असेही पहाणी दरम्यान जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी सांगितले.

मागील बातमी
शिधापत्रिकाधारकांनी 15 एप्रिल पर्यंत ई केवायसी करावी
पुढील बातमी
एक प्रेमळ कुटुंब प्रत्येक बालकांसाठी या उपक्रमांतर्गत

संबंधित बातम्या