पुणे येथे 23 ते 25 फेब्रुवारी कालावधीत अग्निवीर सैन्य भरतीचे आयोजन

by Team Satara Today | published on : 20 February 2026


सातारा  :  युनिट हेडकॉटर कोटामध्ये अग्निवीर सैन्य भरतीचे आयोजन बॉम्बे इंजिनीयर ग्रुप आणि सेंटर खडकी, पुणे मार्फत दिनांक २३ ते २५ फेब्रुवारी २०२६  निट हेडकॉटर कोटा मध्ये अग्निवीर सैन्य भर्तीचे आयोजन  करण्यात आले आहे.

   २३ फेब्रुवारी २०२६ रोजी अग्नीवीर जीडी–मराठा, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी  अग्नीवीर जीडी सिख (एम & आर), अन्य भारतीय जाती आणि मुस्लीम, अग्नीवीर टेक्निकल–AIAC, अग्नीवीर (ट्रेडसमेन) (१० वी आणि ८ वी पास) - AIAC (musician (खुला प्रवर्ग), Chef, Dresser, Steward, Washerman, Mess Keeper & House Keeper).

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी अग्नीवीर खेलकुद खुला प्रवर्ग (फुटबॉल, तैराकी, हॉकी, ॲथलेटिक, हॉलीबॉल, रोईंग, बॉक्सिंग, कबड्डी, बास्केटबॉल, सैलिंग, ब्रेस्टलिंग, क्रॉस कंट्री, हॅडबॉल, त्रिअथलोन, वेट लिफ्टिंग आणि जीमनॅस्टीक). बॉम्बे इंजिनीयर ग्रुप आणि सेंटर खडकी, पुणे द्वारा शिफारस केलेल्या अग्नीवीर खेलकुद (खुला प्रवर्ग) या प्रमाणे अग्नीवीर सैन्य भरर्तीचा कार्यक्रम होणार आहे. तसेच  उमेदवारांसाठी पहाटे ५ ते सकाळी 8  या वेळेत गेट खुले राहील. ८ वाजल्या नंतर प्रवेश दिला जाणार नाही. असेही जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
छ. शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाचे 18 फेब्रुवारी ते 15 मे कालावधीत आयोजन ; नागरिकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे 27 फेब्रुवारी रोजी आयोजन; नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा

संबंधित बातम्या