सातारा : अवैधरित्या दारु वाहतूक केल्याप्रकरणी एकावर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ, ता जावली गावच्या हद्दीत पवनकुमार रामचंद्र वारागडे राहणार कुडाळ, तालुका जावली हा देशी-विदेशी दारूची विक्री करीत असताना आढळून आला. त्याच्याकडून दारूचा मुद्देमाल व मोटरसायकल असा एकूण 56 हजार 240 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याच्यावर मेढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सपोनि संतोष तासगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. डी. जी. शिंदे, पो.कॅा. सनी काळे, दिगंबर माने यांनी सहभाग घेतला. गुन्ह्याचा अधिक तपास पो.हवा.डी.जी.शिंदे हे करीत आहेत.
अवैधरित्या दारु वाहतूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 30 July 2023

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा