शाहूपुरी येथे सुमारे चार लाखांची चोरी

सातारा : शाहूपुरी येथे अज्ञात चोरट्यांनी सुमारे चार लाखांच्या ऐवजाची चोरी केल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूपुरी येथे अज्ञात चोरट्याने 5 तोळ्याचे सोन्याचे गंठण व सोन्याची चेन असा 4 लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला. ही घटना दि. 19 फेब्रुवारी रोजी घडली असून नम्रता युवराज अडसूळ (वय 38, रा. शाहूपुरी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मदने करीत आहेत.


मागील बातमी
राहत्या घरातून एकजण बेपत्ता
पुढील बातमी
भाजपच्या कुरघोडीने जावलीत शिवसैनिकांचा कोडमारा

संबंधित बातम्या