सातारा : आकले, ता. सातारा येथील बिअर शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी बियर, वाईनसह रोख रकमेची चोरी केल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संजय बबन इंदलकर (रा. आकले, ता. सातारा) यांचे तेथीलच कीर्ती बियर शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील 22 हजारांची रोकड, बिअरचा एक बॉक्स आणि वाईनचा एक बॉक्स अशा एकूण 26 हजार 420 रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.